alt tet exam

TET exam फेब्रुवारी महिन्यात होणार टी इ टी परीक्षा

tet exam :- एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरूण-तरूणी परीक्षा देतील असा अंदाज परीक्षा परिषदेचा आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च मध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी TET exam चे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणत: दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरु आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरूणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

banana powder केळीची पावडर बनवून कमवा महिन्याला 15 ते 20 हजार रुपये नफा

दोन टप्प्यात ६५ हजार शिक्षक भरती

सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील २० लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे. त्यामुळे दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांनी त्यासंबंधीचे नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच ३३ ते ३५ हजार पदांची भरती एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.

pm kisan yojna वा हप्ता या तारखेला होणार खात्यात जमा

टेट’ची परीक्षा ऑनलाइन; लगेचच निकाल होईल जाहीर

राज्यात लवकरच शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ‘टेट’ परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यातील सर्वच ऑनलाइन केंद्रांवर होईल. अंदाजित तीन लाख उमेदवार ही परीक्षा देतील असे ग्राह्य धरून नियोजन केले जात आहे.

– महेश पालकर, अध्यक्ष, परीक्षा परिषद

‘खासगी’ला मुलाखतीचे बंधन

खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठे डोनेशन घेऊन शिक्षकांची भरती केली जात होती. आता ‘टेट’मुळे त्याला लगाम लागणार आहे. एका जागेसाठी किमान दहा उमेदवारांना बोलावून मुलाखतीतून त्यांची निवड करणे बंधनकारक असणार आहे. त्याचे रेकॉर्ड शालेय शिक्षण विभागाला द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती ‘पवित्र’मधून मेरिटनुसार होईल.

 


Posted

in

by

Comments

2 responses to “TET exam फेब्रुवारी महिन्यात होणार टी इ टी परीक्षा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?