दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील राशन कार्डधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिका धारकांना प्रति एक किलोचा मानात रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर पामतेल यांचा समावेश असेल राज्यातील एक कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे हा संच एका महिन्याच्या कालावधी करता देण्यात येऊन त्याचे वितरण इ पाच प्रणाली द्वारे करण्यात येईल यासाठी येणाऱ्या एकूण 486 कोटी 94 लाख खर्च देखील मान्यता देण्यात आली आहे सीधा वस्तूचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याचे सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत