RAIN UPDATES :- नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या परतीचा पाऊस चांगला धुमाकूळ घालत आहे .राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे .दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यात परतीचा पाऊस बरसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या मते आज राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात .विजांचा कडकडासह पावसाची शक्यता आहे.
भारताच्या हवामान खात्याने RAIN UPDATES सांगितलेल्या माहितीनुसार .विदर्भ, मराठवाड्यासह इतर भागातही पावसाची हजेरी लावली आहे . उपग्रहांनी घेतलेल्या नवीन छायाचित्राच्या निरीक्षणावरून. भारताच्या द्वीपकल्पातून ढगांची हालचाल अधिक तीव्रतेने होताना दिसत आहे. यामुळे हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये YELLOW ALERT दिला आहे . नरू चक्र वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते . त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्री वारे वाहत असून. हवेतील आद्रता वाढल्याने पुन्हा पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रसह 20 राज्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात सध्या सोयाबीन पीक काढणे सुरू असल्याने . शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसण्याची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना YELLOW ALERT
महाराष्ट्र हवामान खाते यांनी दिलेल्या माहितीनुसार . आज कोकणातील पालघर ,ठाणे ,मुंबई ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून YELLOW ALERT करण्यात आला आहे . तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना सुद्धा जारी करण्यात आला आहे.
यादरम्यान पंजाबराव डक PUNJABRAO DUK यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डक वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार .आज पासून 15 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे .खरं पाहता 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे .त्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.
Leave a Reply