poultry farm scheme :- नमस्कार मित्रांनो आर्थिक वर्ष 2022-23 साठी. कुकुट पालनाचा अनुदान योजनेसाठी आता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी. कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. आणि कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.
महाराष्ट्र शासन यांच्याकडून कुक्कुटपालनासाठी दोन लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या poultry farm scheme अनुदानासाठी. नोंदणी प्रक्रिया ही 13 डिसेंबर 2022 ते 11 जानेवारी 2023 पर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता . नोंदणी करण्यासाठी तुम्हाला department of animal husmabdary government of maharashtra . म्हणजेच पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला कुक्कुटपालना सोबतच आणखीन खूप साऱ्या योजनांचे माहिती सुद्धा घेऊ शकता. आज आपण कुकुट पालनासाठी कोणकोणती बद्दल माहिती घेऊया.
👉👉पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर. तेथे तुम्हाला एक main pageओपन होईल. तेथे योजना या ऑप्शनवर क्लिक करावे. योजना या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला 1000 माणसं कुटुंब कुकुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे या ऑप्शन वर क्लिक करावे. तेथून तुम्हाला अर्जाचा नमुना ओपन होईल तो अर्जाचा नमुना डाऊनलोड करून. प्रिंट काढून घेऊन संपूर्ण माहिती ते भरून तो अर्ज पशु विकास अधिकारी यांच्याकडे द्यावा. या अर्जासोबत तुम्हाला याबद्दलचे काही कागदपत्रे जोडावे लागणार आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया.
आवश्यक कागदपत्रे
- यावर अर्जाच्या नमुना सोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड
- सातबारा
- आठ अ उतारा
- स्वयंघोषणा प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खात्याचे पासबुक
- राशन कार्ड
- सातबारा मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र
- अनुसूचित जाती आणि जमाती असल्यास जातीचा दाखला
- दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
- जन्म तारखेचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला
- रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची झेरॉक्स
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची झेरॉक्स द्यावी लागणार आहे
या योजनेचा लाभ हा मुख्यतः अत्यल्प भूधारक म्हणजे एकेकटर पेक्षा जास्त कमी जमीन असणारे शेतकरी.
अल्पभूधारक म्हणजे एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंत जमीन असणारे शेतकरी.
सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट किंवा वैयक्तिक महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
Leave a Reply