Pm kisan 13th installment new rule नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत तुम्हाला बारा वा हप्ता मिळाला आहे. आणि तेरा व्या हप्त्याची शेतकरी मित्र वाट पाहत आहेत . पण तेराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान योजनेमध्ये नवीन नियम लागू केले आहेत . तर आपण या नियमाबद्दल आता माहिती पाहूया.
मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे pm kisan 13th installment किसान योजनेच्या बारावा हप्ता मिळवण्यासाठी खूप सार्या शेतकरी मित्रांनी ही kyc केलेली नव्हती . त्यामुळे त्यांना बारावा हप्ता मिळवण्यामध्ये खूप परेशानी झाली. पण आता एकेवायसी व्यतिरिक्त सुद्धा नवीन काही नियम लागू करण्यात आले आहे.
आधार कार्ड मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना बारावा हप्ता मिळवण्यासाठी फक्त कोणतेही ओळखपत्र चालत होते. पण आता सरकारने केलेल्या नवीन नियमानुसार तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड सोबतच आता तुमचे रेशन कार्ड सुद्धा तपासले जाणार आहे . आणि पीएम किसान योजनेचा तेरावा मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आणि रेशन कार्ड सोबत तुमचे आधार कार्ड सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे.
पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे . आता सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी नवीन बदलानुसार पीएम किसानचे लाभार्थी आता सहजपणे किसान कार्ड किसान क्रेडिट कार्ड सुद्धा बनवू शकतात . किसान क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळते तसेच तीन लाखापर्यंतच्या कर्जावर चार टक्के सबसिडी दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डवर कर्ज दिली जातात त्यामुळे शेती करणे आणखी सोपे होते.
आतापर्यंत शेतकऱ्यांना येणारे हप्ते तपासण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयात जावे लागत होते. किंवा हे मित्र किंवा ग्राहक सेवा केंद्रावर ही वेळ पैसे आले की नाही तपासण्यासाठी वेळ घालावा लागत होता. पण आता ही समस्या सुद्धा दूर होणार आहे. आणि शेतकऱ्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक असेल तर तो पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी तपासू शकतो. व इतकाच नाही तर एप्लीकेशन मध्ये काही चूक असेल तर तुम्ही हेल्प टॅक्स वरच्या वरून त्या चुका दुरुस्त सुद्धा करू शकता. तसेच डीजीटीलायझेशनच्या युगात आता शेतकरी ही आधुनिक तंत्रज्ञानाने जोडले जात आहेत आणि सर्व शेतकऱ्याकडे आता स्मार्टफोन सुद्धा आहे. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना आणखी एक सुविधा दिली आहे. आणि त्यानुसार पीएम किसान च्या अधिकृत पोर्टलवर स्वतःहून त्यांची स्थिती तपासू शकता. यामध्ये तुम्ही अर्जदार ची स्थिती बँक खात्याचा तपशील आणि पीएम किसान योजनेचे सर्व अपडेट जाणून घेऊ शकता अशा प्रकारे नवीन बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बदल तर मिळणारच आहे शिवाय नवीन कृषी योजनांची जोडण्यासही मदत होणार आहे.
Leave a Reply