pipeline scheme पाइप लाईन साठी मिळवा 50%अनुदान

 pipeline scheme 2022 :- नमस्कार मित्रानो शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे . आणि त्यांना आपले उत्पन्न वाढवता यावे . या साठी आपले सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते आज . आपण यातीलच पाईपलाईन अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.  मित्रांनो या पाईपलाईन योजनेअंतर्गत pipeline करण्यासाठी शेतकऱ्याला सरकार 50 टक्के अनुदान देणार आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो जसे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना अवलंबत असते.  यामधीलच एक योजना आहे शेतकरी पाईपलाईन अनुदान pipeline scheme  योजना . तर या योजनेसाठी सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणार आहे . यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या mahadbt  पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन आपण अर्ज केल्यानंतर . तिथे आपल्याला तुमच्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोताबद्दल माहिती द्यायची आहे . म्हणजेच तुमच्याकडे जर शेततळे असेल तर शेततळे.  विहीर असेल तर विहीर.  किंवा मग इतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही शेतामध्ये पाणी आणणार असाल त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागेल . त्यासोबतच तुम्ही किती वरून पाणी आणणार आहात याबद्दल माहिती द्यावी लागेल.

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर तुम्हाला.  काही दिवसानंतर सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते . त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये आपले नाव असेल तर. असे समजून जा की आपल्याला या योजनेचा100 %  लाभ मिळणार आहे . मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावा लागतील.

कोण कोणती कागदपत्रे अपलोड करावी

  • यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमिनीच्या सातबारा
  • जमिनीचे आठ
  • बँकेचे पासबुक
  • तसेच आपण ज्या स्त्रोतामधून आणणार आहोत त्याबद्दल आपल्याला येथे माहिती द्यावी लागणार आहे.
  • म्हणजे जर तुमच्याकडे शेततळे असेल बद्दल माहिती द्यावी लागेल.
  • विहीर असेल तर विहिरीची नोंदणी केलेली असावी.
  • तसेच जर तुम्ही तलावातून किंवा नदीमधून पाणी आणणार असाल तर त्याचा परवाना सुद्धा तुम्हाला येथे द्यावा लागणार आहे.

महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?