
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पालक शेती कशी करावी . कमी कष्ट आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल. तुम्हाला तर माहीतच आहे पालक हिरव्या भाज्या मध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी भाजी आहे . कारण पालक मध्ये आणि अक्सिडेट आणि अँटिऑक्सिडंट गुड प्रमाणात भेटते . पालक ही एक अशी भाजी आहे जी वर्षभर खाल्ली जाते . आणि पालक भाजीचा सर्वात जास्त उपयोग आपल्याला थंडीचा मौसम मध्ये होताना दिसतो . ही ( palak )पालक भाजी आपल्याला वेगवेगळ्या रोगापासून लढण्याची शक्ती देते . तसेच त्वचा ,केस , डोळे , आणि मेंदूच्या स्वास्थासाठी चांगली आहे .तर त्याला आपण पाहूया पालक शेती कशी करावी.
तसं पाहिलं तर पालक (palak ) शेती ही वर्षभर केली जाते . एक वेळेस लावलेली भाजी आपण पाच ते सहा वेळेस तोडू शकतो . भाजी साठी सर्वात चांगला मौसम हिवाळ्यात असतो . हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने पालकांच जास्तीत जास्त उत्पन्न निघते . लागवडीसाठी सर्वात चांगला वेळ म्हणजे जनवरी-फेब्रुवारी महिना जून-जुलै महिना सप्टेंबर-ऑक्टोबर महिना . या महिन्यांमध्ये आपण लागवड केल्यास जास्त उत्पन्न करू शकतो.
पालकाच्या जर चांगल्या जाती पाहिजे असतील तर पंजाब सिलेक्शन , अनुपमा, ऑल ग्रीन , पंजाब ग्रीन आणि ज्योती पालकांच्या काही सर्वात उत्कृष्ट जाती आहेत.
आपण दोन पद्धतीने लागवड करू शकतो . एक म्हणजे डायरेक्ट शिंपणे किंवा पेरणी करणे . पेरणी करताना प्रतिहेक्टर आपण कमीत कमी 25 ते 30 किलो बी आवश्यक आहे. आपण बी लावण्या अगोदर असले सहा तास पाणी पाण्यामध्ये भिजवावे.
त्या पिकावर कॅटरपिलर नावाच्या आळी चा प्रकोप पाहायला मिळतो . जो कि पालकाचे पाने खातात. तसेच उन्हाळ्यात पाहायला मिळतो यासाठी शेतकऱ्यांनी त्याच्यावर लिंबाच्या पानाचा फवारणी करावी. तसेच वीस लिटर गोमूत्र फवारणी करावी.
काढणे हे त्याच्या लावण्याची पद्धत लावण्याचा वेळ यावर अवलंबून असते . सरासरी तर सांगायचे झाले तर पालक 25 दिवसांमध्ये 15 ते 30 सेंटिमीटर होऊन जाते . आणि त्यानंतर आपण त्याची काढणी करू शकतो .
पालकांचे उत्पन्न पाहायचे झाले तर आपण कमीत कमी 150-250 क्विंटल पीक घेऊ शकतो . ज्याला बाजारात 15-20 रुपये किलो भाव आहे . तर आपण यामध्ये तीन महिन्यात कमीत कमी अडीच लाखांपर्यंत उत्पन्न करू शकतो .
Leave a Reply