onion processing business आता शेतकऱ्यांना कांदा साठवण्याचे टेन्शन नाही

  नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी . आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पन्न घेत असतात . पण कांद्याला कधी भाव राहतो तर कधी राहत नाही  . त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फटका बसत असतो . तर यासाठी उपाय म्हणून आज आपण onion processing business  काय आहे . आणि त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल याबद्दल माहिती घेऊया. 

मित्रांनो सामान  भारतीय घरांमध्ये जेवण कांद्याशिवाय अपूर्ण असते.  कांदा विशेषतः भाजीमध्ये वापरला जातो.  तसेच त्याचे कच्चे देखील सेवन केले जाते  . परंतु  योग्य साठवण व्यवस्थे अभावी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिकाचे नुकसान होते .  शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान होते . सर्वसामान्यांनाही कांद्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत असते  . यात समस्येवर मात करण्यासाठी आणि वर्षभर नफा मिळवण्यासाठी शेतकरी कांद्यावर प्रक्रिया  onion processing करू शकतात.   dehydrated onion  निर्जलीत कांदे आणि कांद्याची पावडर onion powder  बनवून अतिरिक्त कांदा खराब होणे टाळता येते .  आणि वर्षभर त्याचा पुरवठा सुनिश्चित करता येतो .  यासाठी शेतकऱ्यांनी ओनियन फार्मिंग प्रोसेशनचा तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे .

काय आहे कांदा निर्जलीकरण तंत्र येथे पहा पाण्यासाठी येथे क्लिक करा

एकंदरीत  प्रक्रिया करून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवता येणे शक्य होणार आहे .  जेव्हा कांद्याला कमी बाजारभाव असेल तेव्हा शेतकरी बांधव प्रक्रिया करू शकतात  . आणि कमी बाजार भाव देखील शेतकऱ्यांना यामुळे फारसा तोटा सहन करावा लागणार नाही . आणि ते आपला कांदा चांगला साठवून ठेवू शकतात.

डिहायड्रेटेड कांद्याची बाजारपेठ
  • ५.१ टक्के CAGR सातत्याने वाढत आहे. पौष्टिक आहाराबद्दल ग्राहकांची वाढती जागरूकता .
  • डिहायड्रेटेड फूड उत्पादनांचे शेल्फ लाइफ वाढल्यामुळे.
  • डिहायड्रेटेड कांद्याच्या बाजारपेठेच्या विस्ताराला वेग आला आहे.
  • डिहायड्रेटेड कांद्याचे विविध प्रकारचे  health profit आरोग्य फायदे आहेत, ज्यात खोकला आणि सर्दी उपचार, कर्करोग प्रतिबंध आणि मधुमेह व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
  • नजीकच्या भविष्यासाठी, या फायद्यांमुळे विक्रीची क्षमता वाढेल.
  • डिहायड्रेटेड व्हेजचे शेल्फ लाइफ देखील जास्त असते, जे लॉजिस्टिक फायदे प्रदान करते.
  • डिहायड्रेशन तंत्रज्ञानाच्या अनेक फायद्यांचा परिणाम म्हणून, डिहायड्रेटेड कांद्याची बाजारपेठ डिहायड्रेटेड भाज्यांच्या बाजारपेठेसह लॉकस्टेपमध्ये वाढत आहे.

कांदा निर्जलीकरण तंत्र

पावसाळ्यात सर्वात जास्त कांद्याचे नुकसान होत असते. त्यामुळे कारण की कच्चा कांदा जास्त काळ ठेवता येत नाही .त्याला पावसाच्या पाण्याची भीती असते .ओलाव्याची भीती असते . यामुळे कांदा शेतकऱ्यांचा कांदा लवकर खराब होतो.

अशा परिस्थितीत निर्जलीत कांदा हा शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.

यामध्ये कांद्याचे तुकडे करून त्यातील सर्व पाणी एका खास मशीनने वेगळे केले जाते .

सुमारे आठ किलो कच्च्या कांद्यापासून एक किलो निर्जलीत कांदा तयार होतो .

त्याची मागणी प्रक्रिया  उद्योग हॉटेल रेस्टॉरंट इत्यादी मध्ये असते. पण त्याचे  या कांद्याला  international market  मध्ये चांगली मागणी आहे .आपल्या देशात निर्जलीत कांदा फारसा लोकप्रिय नाहीये.

कांदा पावडर कशी बनवावी येथे पहा

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?