alt mashroom farming

mashroom farming करण्यासाठी अनुदान सोबतच सरकार देत आहे ऑनलाइन प्रक्षिशण

mashroom farming  :- नमस्कार मित्रांनो राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध योजना अंतर्गत अनुदान देत असते. आता महाराष्ट्र राज्य सरकारने मशरूम शेतीसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. तर आज आपण मशरूम शेतीसाठी अनुदान कसे मिळवावे. आणि मशरूम शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

मित्रांनो आपण प्रथम मशरूम शेतीसाठी मिळणारे अनुदानाबद्दल माहिती घेऊया. मशरूम उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी सरकार 40% अनुदानावर 8 लाख रुपयांचे credit link based subsidy  देणार आहे. तसेच मशरूम उत्पादन युनिट साठी 40 टक्के अनुदान दिले जाते. ज्याची  किंमत 20 लाख रुपये आहे. यासाठी सरकार आठ लाख रुपये प्रति युनिट  अनुदान देते. यासोबतच 15 लाख रुपयापर्यंतच्या युनिट साठी 40 टक्के अनुदानावर 06 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मशरूम कंपोस्ट युनिट साठी 20 लाख रुपये खर्चही ठेवण्यात आला आहे. एवढ्या खर्चावर शासन तुम्हाला 40% अनुदान देणार आहे. MASHROOM FARMING

coach factory recruitment मध्ये 10वि पास वर बिना परीक्षा भरती

मशरूम शेतीसाठी अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग. किंवा कृषी विज्ञान केंद्र कार्यालयाशी संपर्क साधावा. तेथे तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल यानंतर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन फॉर्म कृषी विभागातच तुम्हाला form submit करावा लागणार आहे.

कागदपत्र

यासाठी तुम्हाला शेतकऱ्याचे आधार कार्ड.

पॅन कार्ड

मतदान कार्ड

बँकेचे पासबुक

शेतकऱ्याचे प्रतिज्ञापत्र

किंवा कर्जाची प्रत

शेतकऱ्याने आपल्या मशरूम युनिट प्रकल्पात चा संपूर्ण प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो.

हे सर्व कागदपत्र तुम्ही कृषी विभागामध्ये सादर केल्यानंतर तुम्हाला तेथून पात्रतेनुसार अनुदान मिळणार आहे.

कशी करावी MASHROOM शेती

तुम्हाला सुद्धा मशरूम शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न काढायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मशरूम लागवडीच्या तंत्राकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला कमीत कमी 40X30 फूट जागेत. 3X3 फूट रुंदीचे रॅक बनवून मशरूमची लागवड करता येते. साधारणता प्रति चौरस मीटर जागेतून दहा किलो मशरूमचे उत्पादन मिळू शकत. मशरूम शेतीसाठी सरकारी अनुदानं देखील उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही हा मशरूम शेती व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी 50 हजार रुपये ते 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही ही मशरूम शेती सुरू करू शकता.

तुम्ही जर सुधारित पद्धतीने मशरूमची शेती केली तर तुम्हाला यामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न सुद्धा होऊ शकते. संपूर्ण जगात मशरूम शेतीचा वाढीचा दर हा 12.9% इतका आहे. तर तुम्ही शंभर स्क्वेअर फुट क्षेत्रात मशरूमची लागवड केली तर वर्षात अखेर तुम्हाला कमीत कमी पाच लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतो.

मशरूम लागवडीमध्ये कंपोस्ट खताची सर्वात जास्त आवश्यकता असते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी तुम्हाला भाताचा पेंडा भिजवावा लागतो. एका दिवसानंतर त्यात DAP, UREA , POTASH, गव्हाचा कोंडा,GYPSUM आणि कार्गो फ्युडोअरन मिसळून कुजवण्यासाठी ठेवलं जातं. साधारणतः दीड महिन्यानंतर याचे कंपोस्ट खत तयार होते. शेणखत आणि माती समप्रमाणात मिसळून दीड इंच जाडीचा थर तयार करून. त्यावर दोन ते तीन इंच जाडी पर्यंत कंपोस्ट खत घातले जात. त्यावर मशरूम पेरले जात. कंपोस्ट मध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी करणे आवश्यक असते. आणि दोन ते तीन इंच कंपोस्ट चा थर घातला जातो अशा प्रकारे मशरूम उत्पादन सुरू होते.

Scholarship Scheme 2023 विद्यार्थ्यांना मिळणार १६ हजार रुपये शिष्यवृत्ती

MASHROOM FARMING साठी जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठ्या सरकार अनेक योजना राबवत असते. देशातील सर्व कृषी विद्यापीठ/ कृषी संशोधन केंद्र मध्ये मशरूम लागवडीचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. एवढेच नाही तर आयसीआरए डायरेक्ट रेट ऑफ मशरूम रिसर्च ICRA DIRECTORATE OG MASHROOM RESERCH CENTRE द्वारे मशरूम लागवडीचे ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

ONLINE TRAINING घेण्यासाठी येथे क्लिक करा .

 

Comments

One response to “mashroom farming करण्यासाठी अनुदान सोबतच सरकार देत आहे ऑनलाइन प्रक्षिशण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?