नमस्कार मित्रांनो आज आपण लेमन ग्रास फार्मिंग LEMON GRASS FARMING बद्दल माहिती घेणार आहे. हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी 20000 ते 40000 रुपये गुंतवून एक ते दीड वर्षात लाखो रुपये कमवू शकता.
लेमन ग्रास फार्मिंग LEMON GRASS FARMING म्हणजे नींबू घासाची शेती होय .तर आपण पाहूया साठी निंबु गवताची लागवड करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल . या गवताची लागवड करण्यासाठी फेब्रुवारी ते जुलै हा टाईम चांगला आहे .हे गवत एकदा लावल्यानंतर सात ते आठ वेळेस कापता येते .आणि एका वर्षात तीन ते चार वेळेस काढता येते . या गवतापासून तेल बनवले जाते या गवताचे एकरी एका कापणीत 30 ते 40 लिटर तेल निघते. या तेलाची किंमत बाजारात 1 हजार ते 1.5 हजार प्रति लिटर आहे . लेमनग्रास लावल्यानंतर तीन ते पाच महिन्यात आपण याची पहिली कापणी करू शकतो. हे गवत कापायला आले का नाही हे पाहण्यासाठी त्याचे पानाचा वास घेतल्यानंतर त्याचा लिंबा सारखा वास येतो . यावरून समजले जाते की हे गवत कापायला आले आहे.
खताची गरज नाही
लेमन ग्रास शेतीमध्ये खताची गरज नसते .तसेच आपल्या शेतातील जनावरांचा सुद्धा याला भीती नाही .आणि एकदा लावल्यानंतर पाच ते सहा वर्ष आपण या गवताची उत्पन्न घेऊ शकतो .लेमन ग्रास पासून निघणाऱ्या तेलाची बाजारात खूप मागणी आहे . या तेलापासून कॉस्मेटिक्स साबण तेल आणि औषधी बनवल्या जातात यामुळेच या तेलाला बाजारात खूप मागणी आहे .
हे गवत लावण्यासाठी तुम्हाला अडीच एकर शेतीसाठी 20 ते 40 हजार रुपये खर्च करावा लागेल .तुम्ही एक वेळेस या गवताची लावणी केल्यानंतर सहा ते सात महिन्यांमध्ये याला कापू शकता . अडीच एकर मध्ये तुम्हाला तीन ते चार वेळेस कटाई मध्ये शंभर ते दीडशे लिटर तेल निघेल . म्हणजे वर्षाला तीनशे ते साडेतीनशे लिटर तेल निघेल . जसे मी सांगितले मार्केटमध्ये तेलाची किंमत हजार ते दीड हजार रुपयापर्यंत आहे . तर तुम्हाला यामुळे एका वर्षात चार ते पाच लाखापर्यंत कमाई होईल .
तर मित्रांनो आज आपण लेमनग्रास फार्मिंग बद्दल माहिती घेतली .जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा .आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा धन्यवाद .
Leave a Reply