नमस्कार मित्रांनो कांदा लागवड करणारे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे . आता कांदा चाळीसाठी महाराष्ट्र सरकार अनुदान देणार आहे. तर आज आपण या kanda chal subsidy scheme बद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो सर्वसाधारणपणे कांदा काढणीनंतर कांदा कुठे ठेवावा . हा शेतकऱ्यांचा एक मुख्य प्रश्न असतो . आणि कधीकधी शेतकरी कांदा साठवून साठवण्याची सोय नसल्यामुळे . तो बाजारात असलेल्या कोणत्याही किमतीवर विकतात आणि त्यामुळे त्यांना नुकसान सुद्धा झेलावे लागते . या साठीच महाराष्ट्र सरकारने एक योजना राबवली आहे .kanda chal subsidy scheme योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.
कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा येथे पहा
सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून. किंवा स्थानिक रित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो . शास्त्रशुद्ध कांदा चाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणोत्तर आखली जाऊन . onion farming करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. यासाठीच राज्य सरकारने आता कांदा चाळणी योजनेसाठी अनुदान जाहीर केले आहे.
योजनेअंतर्गत 5,10,15,20 किंवा पंचवीसmetrik ton क्षमतेच्या कांदा चाळ उभारण्यासाठी . येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 35000 रुपये प्रति मॅट्रिक टन . याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य राज्य सरकार देणार आहे. एका लाभार्थ्याला पंचवीस मॅट्रिक टन क्षमतेच्या मर्यादेपर्यंत कांदा जाळ अनुदान मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहेत अटी
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे ,
सातबारा वर कांद्याचे पिकाची नोंदणी असणे आवश्यक आहे
शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे
या योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
शेतकऱ्यांचा गट
स्वयंसहायता गट शेतकरी महिला गट इत्यादी घेऊ शकतात
महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
कांदा चाळ अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या
उमेदवाराचे आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान कार्ड
बँक खात्याचे पासबुक
मोबाईल नंबर आधार कार्ड से लिंक करणे जरुरी आहे
सातबारा
8A
जातीचे प्रमाणपत्र
यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदा चाळीचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र असणे आवश्यक आहे.
Leave a Reply