ALT GRB SCAM

GRB SCAM बीड जिल्ह्यातील हजारो लोकांचे पैसे बुडाले

GRB SCAM :- नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सध्या GRB घोटाळा खूपच चर्चेमध्ये आहे. आज आपण या जीआरपी घोटाळ्याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जि आर बी घोटाळ्यामध्ये खूप लोकांचे पैसे गुंतले आहेत. कमीत कमी 2000 हून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. जि आर बी घोटाळा हा गणेश सिताराम भिसे पाटील हे मूळचे परळीचे रहिवासी आहेत. यांनी ही जीआरबी स्वराज्य नावाची कंपनी स्थापन केली होती. यामध्ये शेळीपालन, पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग, बँकिंग प्लॉटिंग असे प्रोजेक्ट सुरू केल्याचा दावा करत होते. सुरुवातीला हे शंभर दिवसांमध्ये दीडपट अशी योजना सुरू केली. पण काही दिवसानंतर 120 दिवसांमध्येच ते दीडपट योजनेत आणली होती. पुन्हा बदल करून 150 दिवसात दीडपट आणि नंतर दोनशे दिवसाला दीडपत अशी योजना सुरू केली होती. यामध्ये गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवून 120 दिवसांमध्ये दीडपट रक्कम घेत होते. GRB SCAM

ANGANVADI SEVIKA ६ महिन्यात 20000 अंगणवाडी सेविकांची भरती

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी शहर आणि परिसरात घोटाळ्याचे खूप मोठे जाळे पसरले होते. आणि यामध्ये दोन हजाराहून अधिक लोकांनी पैसे गुंतवणूक होते. यामध्ये कोट्यावधी रुपये घेऊन भिसे पाटील हे फरार झाले आहेत. स्वराज्य जीआरपी कंपनीने शंभर दिवसांमध्ये दीडपट परतावा मिळत असल्याचे अमिश दाखवलं होतं. या आमिसाला शेकडो लोकं बळी पडले. गणेश राजाराम भिसे हे या कंपनीचा संचालक भागीदार होता.

Potato farming बटाटे शेतीची सुधारित पद्धती

सुरुवातीला या कंपनीने अनेक ठेवीदारांना चांगला परतावा दिला. हळूहळू गुंतवणूकदार वाढत गेले करोडो रुपयाचे ठेवी जमा झाल्या. पण जशी गुंतवणूक INVESTMENT वाढली तसेच गेल्या आठ महिन्यापासून अनेक ठेवीदारांच्या मदती संपून देखील परतावाच मिळालेला नाहीये. बीड जिल्ह्यात राहणारे निवृत्ती शिक्षक मधु शिंगारे यांनी या कंपनीत सुरुवातीला तीन लाखाची गुंतवणूक केली होती. त्यांना तीन लाखाच्या गुंतवणुकी नंतर शंभर दिवसांमध्ये दीडपट परतावा मिळाला होता. यानंतर त्यांनी चा कंपनीवर विश्वास बसला आणि नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या कंपनीमध्ये 32 लाख रुपये गुंतवले होते. आता त्यातील त्यांना एक रुपयाही वापस परतावा मिळालेला नाहीये. तसेच प्रतिभा मस्के यांचे पती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात त्यांनी सुद्धा या योजनेमध्ये 23 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या दोघांनाही पैसे परत मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्या तर लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली . लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारकडे हस्तक्षेप करणे करून आपल्या मेहनतीचा परतावा मेळावा अशी विनंती केली आहे. GRB SCAM


Posted

in

by

Comments

One response to “GRB SCAM बीड जिल्ह्यातील हजारो लोकांचे पैसे बुडाले”

  1. […] GRB SCAM बीड जिल्ह्यातील हजारो लोकांचे पैस… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?