govt job alert :- नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे .आता लवकरच महाराष्ट्र सरकार 1000 तलाठी भरती करणार आहे .तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
महाराष्ट्र राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने . महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन. 3165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून . पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती govt job alert करण्यात येईल. अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली आहे .
काय असेल पात्रता
तलाठी पदांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीधर असणे आवश्यक आहे . शासन निर्णय , माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . आवश्यक मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयाची अट
- तलाठी पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे कमीत कमी वय 18 वर्षे .आणि जास्तीत जास्त वेळ 38 वर्ष असावे.
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमीत कमी वय 18 वर्षे जास्तीत जास्त वय 43 वर्षापर्यंत असावे .
- sportsman कोट्यातून तुम्ही जर अर्ज करत असाल त्यासाठी तुमचे कमीत कमी वय 18 वर्षे ते जास्तीत जास्त 43 वर्षे वय असावे.
- प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त आणि अपंग व्यक्तींना यासाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे वय असावे.
- माजी सैनिकांचे वय कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 45 वर्ष असावे.
काय असेल परीक्षेचे स्वरूप
- तलाठी या परीक्षेसाठी एकूण शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका असणार आहे .
- आणि एका प्रश्नाला दोन गुण असे परीक्षेचे स्वरूप असणार आहे
- यामध्ये मुख्यतः बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न असतील या 25 प्रश्नांना 50 मार्क असतील.
- सामान्य ज्ञान किंवा general knowledge साठी 25 प्रश्न असतील यासाठी पण 50 मार्क असतील .
- इंग्रजी भाषेसाठी ( English ) 25 प्रश्न असतील 50 मार्कासाठी 25 प्रश्न असतील .
- आणि मराठी भाषेसाठी 50 मार्कासाठी 25 प्रश्न असणार आहेत.
Leave a Reply