forest recruitment :- नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी खूप विद्यार्थी वाट पाहत आहेत. याबद्दलच आता एक मोठी अपडेट सुद्धा आली आहे. या अपडेट मध्ये महाराष्ट्र शासनाने भरती कशी होणार आहे. भरती मध्ये परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे. आणि फिजिकल टेस्ट कशी होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तर आपण ही संपूर्ण माहिती पाहूया.
मित्रांनो forest recruitment रिक्त पदांची जाहिरात वृत्तपत्रांमधून देण्यात येणार आहे. त्याकरता संबंधित प्रादेशिक विभागामधील अधिक खप असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये रोजगार विषयक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात येणार आहे. यापैकी किमान एक वर्तपत्र हे मराठी असणार आहे. आणि तसेच वनरक्षक भरतीची जाहिराती माहिती व जनसंपर्क संचालनायालयामार्फत देणार देण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला जर या नोकरीविषयी जाहिरात ऑनलाईन पाहिजे असेल तर ती ऑनलाईन पाहण्यासाठी. WWW.ROJGAR.MAHASWAYAM.GOV.IN या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असणार आहे.
परीक्षा शुल्क या परीक्षेसाठीEXAM FEES किती लागणार आहे. याबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये पण हे परीक्षा शुल्क आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.
परीक्षेचे स्वरूप
सर्व उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा होणार आहे. आणि 80 गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ पर्यायी स्वरूपात घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञान जैवविविधता वने वन्यजीव पर्यावरण संतुलन या विषयासाठी 30 गुण असणार आहेत. बौद्धिक चाचणीसाठी 30 गुण असणार आहेत. मराठीसाठी 30 गुण असणार आहेत. आणि इंग्रजीसाठी 30 गुण असणार आहेत.
लेखी परीक्षेच्या उमेदवारांची किमान 45% गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांची तपासणी प्रादेशिक निवड समिती मार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यतः वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग इत्यादी बाबत उमेदवारांचे मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाही. ते भरती प्रक्रियेतून बाद राहतील. वनरक्षक पदांच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता उंची छाती इत्यादी धारण करतात. तेव्हा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरिक मोजमापे होणार आहेत. जे उमेदवार आवश्यक शारीरिक पात्रता धारण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाचा 27 /12/2022 तारखेचा येथे पहा
कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून. इतर पुरुष उमेदवारांची तीस मिनिटात पाच किलोमीटर व महिला उमेदवारांची 25 मिनिटात तीन किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. या धावण्याच्या चाचणीमध्ये पुरुषांसाठी 17 मिनिटात जर पाच किलोमीटर पूर्ण केले तर 80 टक्के गुण मिळणार आहेत. म्हणजे 80 पैकी 80 गुण राहणार आहेत. यानंतर दर एक मिनिटाला दहा गुण कमी होणार आहेत. अशा प्रकारे सर्वात शेवट म्हणजे 28 मिनिटे टाईम लागला तर पाच गुण तुम्हाला या रनिंगसाठी मिळणार आहेत. महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर धावण्याची शर्यत होणार आहे. यामध्ये बारा मिनिटात तीन किलोमीटर रनिंग पूर्ण केल्यास 80 गुण मिळणार आहेत. यानंतर प्रत्येक मिनिटाला दहा गुण कमी होणार आहेत. असे शेवटचे म्हणजे 23 मिनिटांमध्ये जर तुम्ही रनिंग पूर्ण केली तर तुम्हाला यामध्ये पाच गुण मिळतील.
यानंतर तुमचे लेखी परीक्षेचे आणि रनिंगचे हे दोन्ही गुणांचे मिळून बेरीज करून तुमची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. आणि या प्रकारे तुमचे सिलेक्शन होणार आहे.
Leave a Reply