alt

farming idea मेथी लागवड करून दीड महिन्यात काढा 50000 रुपये उत्पन्न

 farming idea :- नमस्कार मित्रांनो शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असतात . यामध्येच वेगवेगळे पिके सुद्धा घेत असतात . तर आज आपण अशाच एका  पिकाबद्दल माहिती घेणार आहोत.  यामध्ये आपल्याला कमी खर्च , कमी वेळ आणि कमी मेहनतीमध्ये चांगले उत्पन्न निघू शकते . तर चला आपण माहिती घेऊया .

farming idea ;- तर मित्रांनो आज आपण मेथीची लागवड कशी करावी.  आणि त्यापासून चांगले उत्पन्न कसे घेता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत.  मेथीचे शास्त्रीय नाव Trigonella frenum-graecum हे आहे.  पाने व बिया या दोन्ही रूपात वापरली जाते . मेथीची पाने भाजी म्हणून वापरली जातात . तसेच मेथी दाणे हे मसाल्याच्या पदार्थ म्हणून वापरले जातात.  कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथी पाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थात वापरली जातात.

मेथीच्या सुधारित वानांची माहिती येथे पहा

मेथी मध्ये असलेल्या विविध गुणधर्मामुळे मेथीला शहरी भागात चांगली मागणी आहे . हे पाहता city  लगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.  मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी.  तर बियांचा वापर मसाल्याचे पदार्थ आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो . मेथी मध्ये विविध गुणधर्म आहेत A, B, C  ही जीवनसत्वे  ( vitamin ) तसेच प्रथिने , मॅग्नेशियम,  फॉस्फरस , पोटॅशियम , iron मोठ्या  प्रमाणात असतात.  पाचक असून यकृत व लिहा यांची कार्यक्षमता वाढवते . त्यामुळे पंचक्रियेची कार्यक्षमता वाढते.

मेथीच्या लागवडीसाठी  बागायतीची  सोय असलेल्या . जुन्या मुरलेल्या बागायत जमिनीमध्ये उत्तम येते . पाण्याचा निचरा असणारी आणि मध्यम खोलीची खासदार जमीन असावी.

मेथी लागवडीसाठी थंड हवामानात तसेच योग्य सूर्यप्रकाश व हवेत आद्रता असताना करणे आवश्यक असते.  उन्हाळ्यात देखील मेथीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते.

मेथीचे रान नांगरू नये कारण बी खोल जाऊन उगवण  मार खाते . त्यासाठी जमिनीची फणनी करून मशागत करावी . म्हणजे बियाची उगवण होऊन मुळे चांगली जमिनीत रुततात.  कल्पतरू सेंद्रिय खत टाकून सारे ओढावेत . मेथी फेकण्यापूर्वी एक पोत्यात एक लिटर जर्मिनेटर  +प्रोटेक्टंट अडीचशे ग्रॅम आणि 50 ते 60 लिटर पाणी . या द्रावणामध्ये मेथी बी रात्रभर भिजवून नंतर उपसून सावलीत प्लास्टिक कागदावर सुकवावे . नंतर वाफ्यात पेरावे  किंवा फेकावे बी साधारणतः चार ते पाच दिवसात उन्हाळा असतानाही उगवून येते.  एकरी बियाणे 80 किलो लागते . बीजीसाठी मेथी करायची असल्यास लांब सारणे पाडवावेत.

मेथीवर रोग व किडींचे प्रादुर्भाव शक्यतो होत नाही . उन्हाळ्यात पालेभाज्यांचे बाजार भाव वाढलेले असतात . त्यामुळे बाजार भाव मिळण्यासाठी मेथी केली जाते . मात्र उन्हाळ्यात देखील उष्णतेमुळे मेथीची मर मोठ्या प्रमाणात होते . इतर रासायनिक औषधे वापरून देखील फायदा होत नाही.  त्यामुळे मोठे नुकसान होते त्यासाठी बीज प्रक्रियेच्या वेळेसच जर्मिनेटर चा वापर करून.  फवारण्या वेळेवर केल्या तर मर  उन्हाळ्यात देखील होत नाही.

मेथीच्या कोणत्या बियाणाची पेरणी करावी येथे पहा

farming idea :- अधिक दर्जेदार उत्पन्न घेण्याकरता औषधाच्या खालील प्रकारे फवारण्या कराव्यात

पहिली फवारणी :-  उगवण नंतर आठ ते दहा दिवसांनी जर्मिनेटर अडीचशे ml , थ्राईवर अडीचशे मिली ,क्रॉप शाईनर अडीचशे मिली, प्रोटेक्ट अडीचशे ग्राम ,100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दुसरी फवारणी :-  उगवणी नंतर वीस ते पंचवीस दिवसांनी जर्मनी 400 मिली थ्राईवर साडेतीनशे मिली,  क्रॉप शाईनर  पाचशे मिली, प्रोटेक्ट अडीचशे ग्रॅम , हर्मोनी 100 मिली,  दीडशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

तिसरी फवारणी  :- उगवणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी जर्मिनेटर पाचशे मिली थ्राईवर साडेतीनशे मिली , crop shiner  ५०० मिली, हार्मोनी दीडशे मिली, प्रोटेक्टर अडीचशे ग्रॅम ,दीडशे लिटर पाण्यात मिसळून करावे.

मेथी भाजी जातीनुसार पण 35 ते 40 दिवसात काढणी योग्य होते . फुलोऱ्यावर येण्याअगोदर भाजीची काढणी करावी लागते.  वरील प्रकारे फवारणी केल्यास मेथीची पाने रुंद होऊन.  चमक व तेज येते त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात . तसेच नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस मेथीची पूर्ण वाढ होऊन काढणीस लवकर येते.

पावसाळ्यात मेथीच्या एक गुंठ्यात 100 गड्ड्या निघतात.  परंतु वरील पद्धतीने लागवड केल्यास उन्हाळ्यात देखील . मेथीच्या 150 ते 200  गड्ड्या एका गुंठ्यात उत्पन्न होईल.  आरोग्याच्या दृष्टीने मेथी फलदायी असल्याने.  बाजारपेठेत तिला चांगली मागणी असते.  मेथीची एक गड्डी कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत जाते . त्यामुळे आपल्याला मेथीचे उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार आहे . आणि त्यामधून नफा सुद्धा चांगला होणार आहे.

  • एक एकर मध्ये ४००० गड्ड्या निघतील
  • 20 रुपये प्रति गड्डी म्हणजे 80000 रुपये
  • दीड महिन्यात ८०००० रुपये उत्पन्न

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?