alt election

election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या तारखेपासून होणार सुरु

election ;- नमस्कार मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने 750 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह सरपंच पदाच्या थेट निवडणूक साठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे .अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी दिली आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 7751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त, यूपीएस मदान यांनी एका निवेदनात निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना म्हटले आहे की, नव्याने स्थापन झालेल्या काही ग्रामपंचायतींव्यतिरिक्त, या यादीमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान ज्यांचा कार्यकाळ संपत आहे. अशा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या घोषणेमुळे या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. election

राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान (State Election Commissioner UPS Madan) यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल

मित्रांनो महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत.
  1.  अहमदनगर- २०३,
  2. अकोला- २६६,
  3. अमरावती- २५७,
  4. औरंगाबाद- २१९,
  5. बीड- ७०४,
  6. भंडारा- ३६३,
  7. बुलडाणा- २७९,
  8. चंद्रपूर- ५९,
  9. धुळे- १२८,
  10. गडचिरोली- २७,
  11. गोंदिया- ३४८,
  12. हिंगोली- ६२,
  13. जळगाव- १४०,
  14. जालना- २६६,
  15. कोल्हापूर- ४७५,
  16. लातूर- ३५१,
  17. नागपूर- २३७,
  18. नंदूरबार- १२३,
  19. उस्मानाबाद- १६६,
  20. पालघर- ६३,
  21. परभणी- १२८,
  22. पुणे- २२१,
  23. रायगड- २४०,
  24. रत्नागिरी- २,
  25. सांगली- ४५२,
  26. सातारा- ३१९,
  27. सिंधुदुर्ग- ३२५,
  28. सोलापूर- १८९,
  29. नागपूर- २२५,
  30. परभणी- २२६, ,
  31. सातारा- ३१९,
  32. सिंधुदुर्ग- ३२५,

 

28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान, तर छाननी 5 तारखेला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर आहे, त्यानंतर राज्य निवडणूक आयोग उमेदवारांची अंतिम यादी त्यांच्या वाटप केलेल्या निवडणूक चिन्हासह प्रकाशित करेल. 18 तारखेला निवडणुका होणार असल्याने 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
western railway मध्ये 10वी पास साठी नोकरीची संधी
Aadhar card updating आधार कार्ड धारक लगेच करा हे काम नाहीतर कार्ड होणार बंद
Home branch घरबसल्या एका दिवसात तुमच्या बँकेची शाखा बदला
EWS certificate कसे काढावे संपूर्ण माहिती

Comments

One response to “election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या तारखेपासून होणार सुरु”

  1. […] election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या ता… Aadhar card updating आधार कार्ड धारक लगेच करा हे काम नाहीतर कार्ड होणार बंद Home branch घरबसल्या एका दिवसात तुमच्या बँकेची शाखा बदला wheat farming गव्हाची पेरणी आणि व्यवस्थापन पद्धती EWS certificate कसे काढावे संपूर्ण माहिती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?