alt Coriander cultivation

Coriander cultivation उन्हाळी कोथिंबीर लागवड करून काढा लाखोंचे उत्पन्न

Coriander cultivation  :- नमस्कार मित्रांनो कोथिंबीरीच्या स्वादिष्ट पानामुळे कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. तसे पहिले तर कोथिंबीर ही जास्त करून खरीप, रब्बी हंगामामध्ये घेतली जाते. पण कोथिंबीर ची सर्वात जास्त मागणी ही उन्हाळ्यामध्ये असते आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबिर पीक खूप कमी लोक घेतात. त्यामुळे कोथिंबीर आपल्याला भाव सुद्धा चांगला मिळतो. तर आज आपण कोथिंबीर ही उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीची लागवड कशी करायची. आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो कोथिंबीर लागवड Coriander cultivation करण्यापूर्वी आपल्याला त्यासाठी व्यवस्थितपणे जमीन तयार करावी लागेल. जमीन तयार करताना आपल्याला कोथिंबीर पेरणी लागवडी पूर्ण पूर्वी जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावी लागतील. तसेच कुळवाच्या दोन पाळ्या माराव्यात. कुळवाच्या पाया मारताना शेतामध्ये हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत असेल तर शेणखत घालावे. आणि लागवडीसाठी जमीन भुजबुजित करून घ्यावी. कोथिंबीर पाण्यात पेरण्यासाठी तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. आणि कोथिंबीरची पेरणी बी फेकून किंवा 20 सेंटीमीटर अंतरावर रेषा काढून पातळ पेरणी करता येते.

कोथिंबिरीच्या पेरणीसाठी सुधारित वाणांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोथिंबीरीची पेरणी करण्या अगोदर बी हे पेरणीपूर्वी रात्रभर भिजवून पेरल्यास बी लवकर म्हणजेच दहा दिवसाच्या आत उगवते. तसेच आपल्याला हेक्टरी कमीत कमी 30 ते 40 किलो बियाणे पुरेसे होते. पूर्व मशागतीच्या वेळी खत वापरले असेल तर. पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार 2 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 20 किलो पालाश हे सुद्धा टाकावे. पेरणीनंतर वीस दिवसांनी 20 किलो नत्र द्यावे आणि एक टक्का युरियाची फवारणी करावी.

आमच्या whatsapp group ला जुडण्यासाठी येथे क्लिक करा

पाण्याचे व्यवस्थापन

कोथिंबीर शेती कर करताना भरपूर पाणी द्यावे लागते. त्यामुळे आपल्याला ज्या हंगाम आहे त्या हंगामानुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार त्याच बरोबर पिकाच्या आवश्यकतेनुसार सुद्धा पाणी देणे गरजेचे असते. कारण तुम्हाला तर माहीतच आहे. पावसाळ्यामध्ये पाणी द्यायची गरज नाही. हिवाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणी द्यावे लागते. परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याला कमीत कमी चार ते पाच दिवसाच्या गॅप नुसार यामध्ये पाणी देणे आवश्यक असते.

Compensation subsidy या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ६७५ कोटी नुकसानभरपाई

या पिकावर कुठल्याही प्रकारचा कीड किंवा रोगाचा प्रवाह आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाही. वातावरणामध्ये जास्त काही बदल झालेच तर कोथिंबीर पिकांमध्ये तुरळ प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये कोथिंबीर लाल पडणे असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग एक वचनी पिकांमध्ये जास्त प्रमाणात येत असतात. तर त्यांच्या नेत्रणासाठी आपल्याला एखादी फवारणी करून घेणे आवश्यक असते. किंवा वातावरणामध्ये बदल झाले नाही आणि वातावरण चांगले असेल तर कोथिंबिरीच्या पिकामध्ये एकही फवारणी करण्याची गरज पडत नाही.

675 कोटी नुकसान भरपाई या 10जिल्ह्यात वाटणार

पिकांची काढणी

कोथिंबीर हे पीक आपल्याला 35 ते 40 दिवसांमध्ये कोथिंबीर काढण्यासाठी येते. 15 ते 20 सेंटीमीटर उंचीची होते त्यावेळी ती  कापून आपण याची काढणी करू शकतो. पेरणीच्या दोन महिन्यानंतर कोथिंबीरला फुले यायला सुरुवात होते. त्यामुळे त्या आधीच याची काढणी करणे आवश्यक असते. पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबिरीचे एकरी चार ते सहा टन उत्पादन मिळते. तर उन्हाळी हंगामात तेच उत्पादन साडेतीन अडीच ते साडेतीन टनापर्यंत आपल्याला मिळू शकते.

mpsc bharti feb 2023 लोकसेवा आयोग भरणार 673 रिक्त पदे

Comments

One response to “Coriander cultivation उन्हाळी कोथिंबीर लागवड करून काढा लाखोंचे उत्पन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?