central railway :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि ITI पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मध्य रेल्वेने दहावी पास विद्यार्थ्यांसाठी 2422 जागांवर भरती काढली आहे. तरी या भरती बद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये दहावी पास वर एकूण 2422 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबर 2022 पासून अर्ज सुरू झाले आहेत. आणि 15 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. central railway
UGC NET परीक्षे साठी अर्ज सुरु
ही भरती विभागानुसार होणार आहे. मुंबई विभागांमध्ये एकूण 1659 जागा आहेत. भुसावळ विभागामध्ये 418 जागा आहेत. पुणे विभागांमध्ये 152 जागा आहेत. नागपूर विभागांमध्ये 114 जागा आहेत. तर सोलापूर विभागामध्ये एकूण 79 जागावर भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
मित्रांनो वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि दहावी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुणासह पास आवश्यक आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराने फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टेलर, इलेक्ट्रिशियन, मशीन नेस्ट मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, असिस्टंट टर्नर ,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मोटर मेकॅनिकल , इलेक्ट्रॉनिक सिस्टम, मेंटेनन्स वरीलपैकी कोणत्याही एका ट्रेड मधून आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
👉👉जहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
वयोमर्यादा अर्ज करणारे उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2023 रोजी कमीत कमी पंधरा वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असावे. यामध्ये एससी एसटी कॅटेगिरी साठी पाच वर्षासाठी ची सूट आहे. तर ओबीसी कॅटेगिरी साठी तीन वर्षांची सूट आहे.
परीक्षा फीस जनरल आणि ओबीसी कॅटेगिरी साठी शंभर रुपये परीक्षा फिश असणार आहे. तर एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी कोणतीही परीक्षा फीस असणार नाहीये.
Leave a Reply