Cardamom cultivation :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रभर शेतकरी विविध पिकांची शेती करता असतात .आणि त्यामधून चांगले उत्पन्न सुद्धा घेतात पण आज आपण अशाच एका पिकाच्या शेतीबद्दल बोलणार आहोत . जे आपल्याला उत्पन्न कमी तरी आले तरी त्याची मार्केटमध्ये खूपच चांगली मागणी आहे. आणि त्यामुळे त्याचा भाव सुद्धा एकदम आभाळाला भिडलेला आहे.
मित्रांनो बघायचे झाले तर काळाच्या ओघात शेतीमध्ये खूप मोठे मोठे बदल झालेले आहेत . राज्यातील प्रबळ शेतकरी मित्र वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेती करून यासोबतच शेती व्यवसाय करून लाखो रुपयांची उलटाल करत आहेत. आपल्या राज्यांमध्ये सध्या वेलची लागवड खूप सुद्धा चांगलीच चालू आहे . मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की वेलचीचे हे पीक फक्त केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये घेतले जाते .या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हे पीक घेतले जाते .मात्र आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेलची पीक महाराष्ट्र मध्ये घेऊन उत्पादन काढत आहेत. विशेष सांगायचे झाले तर राज्यातील शेतकरी वेलचीची शेती करून चांगले कमाई देखील करत आहेत. Cardamom cultivation
शेतकरी मित्रांनो जाणकार लोक सुद्धा शेतकऱ्यांना वेलचीची शेती करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. आणि ही शेती करत असताना पीक पद्धतीमध्ये मोठा बदल केला पाहिजे हे देखील सांगत आहेत . अशा माध्यमातून Cardamom cultivation पीक घेऊन शेतकरी बंधू भगिनी चांगलाच नफा मिळू शकतात.
वेलची शेती कशी करावी
- कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वेलची लागवड करण्याकरता तापमान हे कमीत कमी 10 डिग्री किंवा जास्तीत जास्त 35 डिग्रीपर्यंत असावे .
- अशा तापमानांमध्ये वेलचीचे पीक वेगाने विकसित होत असते.
- आणि त्यामुळे चांगले उत्पादन यातून आपल्याला मिळते .
- तसेच वेलची या पिकाची लागवड करायची असल्यास त्यांनी काळी कसदार चिकन मातीच्या जमिनीचा अवलंब करावा .
- अशा परिस्थितीमध्ये वेलची लागवड केली तर यामधून चांगलेच उत्पादन प्राप्त होते .
- काळी जमीन निवडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे काळी जमिनीतून पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होणारा असावा .
- वेलचीची रोपे तयार करून मग त्यांची लागवड केल्यास 90 ते 100% झाडांची वाढ होण्यास मदत होते.
- यासाठी रोपवाटिकेमध्ये वेलचीचे रोपे तयार केले जातात.
- अनुभवी लोकांच्या मध्ये एक हेक्टर जमिनीमध्ये वेलचीचे रोप तयार करायचे असल्यास तर वेलचीचे एक किलो बियाणे पुरेसे आहे.
- वेलचीची लागवड केल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर या पिकापासून आपल्याला उत्पादन मिळते .
- कृषी क्षेत्रामधील अनुभवी लोकांनी सांगितलेनुसार वेलची या पिकाची योग्य काळजी घेतल्यास .
- यासोबतच वेळोवेळी योग्यते व्यवस्थापन केल्यास प्रति हेक्टरी 150-200 किलो वेलची चे उत्पादन आपल्याला मिळते
- वेलची ची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
- कारण ही वेलची बाजारामध्ये अतिशय जास्त दराने विकली जाते.
- बाजारात वेलचीचे भाव 1000-2000 रुपये पर्यंतचा भाव प्रति किलो मागे मिळत आहे.
- जर शेतकरी बंधू भगिनींनी योग्य वेळी योग्य ती काळजी घेतली तर त्यांना एक हेक्टर क्षेत्रामधून वेलची शेती करून जवळपास 300000 रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो.
election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या तारखेपासून होणार सुरु
Aadhar card updating आधार कार्ड धारक लगेच करा हे काम नाहीतर कार्ड होणार बंद
Home branch घरबसल्या एका दिवसात तुमच्या बँकेची शाखा बदला
wheat farming गव्हाची पेरणी आणि व्यवस्थापन पद्धती
EWS certificate कसे काढावे संपूर्ण माहिती
Leave a Reply