नमस्कार मित्रानो १० वी पास आणि आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. BORDER SECURITY FORCE म्हणजे BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी १३०० पदांची मोठी भरती होणार आहे. तर आज आपण या पदांसाठी आवश्यक माहिती आणि अर्ज कसा करायचा या बद्दल माहिती घेणार आहोत.
तर मित्रानो BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी होणाऱ्या भरती चे नोटिफिकेशन ५ तारखेलाच आले होते. या मध्ये BSF हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि मेकॅनिक या पदांसाठी १३०० जागा आहेत .या मध्ये रेडिओ ऑपरेटर पदासाठी ९८२ पदे आणि रेडिओ मेकॅनिक पदासाठी ३३० जागा आहेत.
काय असेल शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
रेडिओ ऑपरेटर या पदासाठी १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे . तसेच रेडिओ मेकॅनिक पदासाठी १० वी /१२ वी पास तसेच आय टी आय झालेला असणे आवश्यक आहे . वयोमर्यादा या पदांसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त २५ वर्ष असणे आवश्यक आहे.
हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर रेडिओ मेकॅनिक पदासाठी पदासाठी कमीत कमी पगार २५५०० ते ८११०० रुपये असणार आहे.
या पदासाठी उंची कमीत कमी १६२ सेंटिमीटर आणि छाती कमीत कमी ७६ सेंटीमीटर असणे आवशक आहे .तुमची PHYSICAL टेस्ट मध्ये ५ किलोमीटर धावणे १० पुश अप्स लांब उडी या प्रक्रिया होतील. या मध्ये तुम्हाला तिन्ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे.
Leave a Reply