bmc recruitment :- नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 461 जागांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. ही भरती बारावी पास वर घेतली जाणार आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.
मित्रांनो जसे मी वरती सांगितले बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत भरती निघाली आहे. यामध्ये तब्बल 461 जागांची नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व अर्ज offloine पद्धतीने करायचे असून हे अर्ज 16 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. आणि 25 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. bmc recruitment
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र
उमेदवाराने अर्ज करताना आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
उमेदवार अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
तसेच दहावी पास आणि बारावी पास चे मार्कशीट
या सर्वांची झेरॉक्स करून एफिडेविट करून अर्जासोबत पाठवायची आहे.
पगार
या भरतीमध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 25 हजार पाचशे रुपये ते 81 हजार शंभर रुपये प्रति महिना पगार भेटणार आहे.
अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला मुंबई पब्लिक स्कूल जगन्नाथ भातणकर मार्ग शिरोडकर मंडई जवळ परळ मुंबई 400 12 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा:-
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-

free dish TV या नागरिकांना मिळणार मोफत dish tv
Leave a Reply