biomas stove :- नमस्कार मित्रांनो खेड्यापाड्यामध्ये किंवा गावामध्ये जास्तीत जास्त महिला. चुलीवरच स्वयंपाक करत असतात परंतु आता शासनाने नवीन योजना आणली आहे. आणि या योजनेद्वारे महिलांना मोफत बायोमास चुली दिल्या जाणार आहेत. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो आता सर्वत्र प्रदूषण वाढले आहे. परंतु यातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपले राज्य नेहमीच प्रयत्नशील असते. ही निर्धूर चूल योजना यातीलच एक भाग आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यामध्ये वायू प्रदूषण कमी. करण्यासाठी निर्धूर चूल योजनेतून गरीब गोरगरीब कुटुंबांना मोफत बायोमास चुली योजना सुरू करत आहे. biomas stove
rashancard new rule jan 2023 रेशन दुकानावर आता हि मशीन लावणार
केंद्र सरकारतर्फे सुद्धा उज्ज्वला गॅस योजनेमधून गोरगरिकांना मोफत गॅस सुद्धा शासनाकडून मिळालेला आहे. आता याच पद्धतीने शासनाकडून निर्धूर चूल वाटप सुरू होणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे. तसेच या चुलीवर जेवण बनवण्यासाठी लाकडांची गरज जास्त लागत नाही. त्यामुळे जंगल तोड देखील कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेतून एकंदर संपूर्ण पर्यावरणाचा तोल सावरला जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाल.
- त्यानंतर तेथील होमपेजवर महाप्रीत या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज उघडणार आहे.
- यामध्ये आपल्याला लेटेस्ट नोटीस वर क्लीन कुकिंग डिस्ट्रीब्यूशन व यावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हाला मुख्य ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- आणि तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडणार आहे.
- अर्ज वाढल्यानंतर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून भरायची आहे.
- भरल्यानंतर तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन सबमिट करून ऑनलाईन निर्दोष योजनेसाठी तुमचे नाव नोंदवू शकता.
Leave a Reply