नमस्कार मित्रानो बांबू पासून चटई , FARNITURE ,खेळणे आणि सजावटीचे अनेक सामान बनवले जाते . तसेच बांबू पासून कागद सुद्धा बनवले जातात .आज आपण बांबू शेती कशी करावी . बांबू शेती BAMBU SHETI मधून किती उत्पन्न निघेल. आणि या शेती चे फायदे आणि तोटे या बद्दल माहिती घेणार आहोत .
भारतात ग्रामीण भागात बांबू ची शेती BAMBU SHETI खूप मोठ्या प्रमाणात केली जाते . बांबू शेती एक अशी शेती आहे. जे एक वेळेस लागवड केल्यास 40-100 वर्षापर्यंत आपण त्याचा फायदा घेऊ शकतो .शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्या साठी भारत सरकार सुद्धा प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे .भारत सरकारने या साठी २००६ -०७ मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले आहे . या योजनेअंतर्गत सरकार बांबू शेती साठी आर्थिक मदद सुद्धा करत आहे .
बांबू लागवडीचे फायदे
ची लागवड एकदा केल्या नंतर त्याचे उत्पन्न आपण १०० वर्षापर्यंत घेऊ शकतो. कारण बांबू ची आयु मर्यादा ४० ते १०० वर्ष आहे .
बांबू कमी किंवा जास्त पाऊस याचा कोणता हि प्रभाव पडत नाही .तसेच बांबू च्या बेटांमध्ये दरवर्षी ८-१० नवीन बांबू तयार होतात.
पहिले २ वर्ष सोडल्या नंतर बांबूचे उत्पन्न सुरू होते.
भारत सरकार बांबू लागवडीसाठी १० एकर जमीन असल्यास ८०% तर १० एकर जमीन असल्यास ५०% अनुदान देत आहे .
सबसिडी ऑनलाईन पद्धतीने निवड करून दिली जाते . या साठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे जमा करावी लागतात.
जमिनीचा सातबारा आणि आठ अ आणि नकाशाची प्रत.
उमेदवाराचे रहिवाशी प्रमाणपत्र.
लागवडी साठी पाणी आणि बांबू रक्षणासाठी सोय असण्याचे हमीपत्र.
आधारकार्ड पॅनकार्ड.
बँकेचे पासबुक.
शेतामध्ये विहीर किंवा बोर असल्याचे प्रमाणपत्र.
Leave a Reply