कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अटी खालील प्रमाणे आहेत

केवळ महाराष्ट्र राज्यातील भूमिहीन शेतमजुरांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे

महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील भूमीहीन शेतमजुरांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही

लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन शेतमजूर असावा

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार आजचे वय 18 ते 60 वर्षे असावे

परित्यकता विधवा स्त्रियांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येते

या योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही

तसेच विकता येत नाही

या कुटुंबाला देण्यात येणारे हे कर्ज हे बिनव्याजी दहा वर्ष मदतीसाठी असणार आहे

कर्जाची सुरुवात कर्ज मंजुरी नंतर दोन वर्षानंतर सुरू होणार आहे

या योजनेमधील लाभधारकांनी जमीन स्वतः कशाने आवश्यक असून

तसा करारनामा देणे बंधनकारक आहे

महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही

जमीन खरेदी करताना प्रति एकरी तीन लाख रुपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समिती देण्यात आलेली आहे

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

राशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला

ई-मेल आयडी

लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याचे विहित प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज फोटो

बँक खात्याचे डिटेल्स

वयाचा दाखला

जातीचे प्रमाणपत्र

निवडणूक कार्ड प्रमाणपत्र

शेतमजूर भूमी अर्जदार हा भूमी शेतमजूर असल्याचा तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला

शेत जमीन पसंती बाबत लाभार्थ्यांचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल

× How can I help you?