मित्रांनो कारल्याची शेती करताना आपण यामध्ये आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो आणि यामध्ये मुख्यतः धने किंवा मेथीचे उत्पन्न आपण यामध्ये घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला कारल्याचे वेल नेटवर्क गेल्यानंतर त्यामध्ये आपण छोटे छोटे गादीवाफे बनवून त्यामध्ये धने किंवा मेथी उगवू शकतो आणि कारल्याच्या उत्पन्नासोबतच आपल्याला धने आणि मेथी यांच्या सुद्धा उत्पन्न होईल ट्रॅप पद्धतीनुसार कारल्याचे बीज आपण शेताच्या किंवा आपण बनवलेल्या आधीच्या वाफेच्या कडेला लावून त्यामध्ये आत मध्ये मोकळ्या जागेत गादीवाफे करून उत्पन्न घेऊ शकतो आणि कारल्याचे वेल वरती असल्यामुळे आपल्याला यामध्ये धन्याचे उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे होते